डॉ सचिन घोळवे यांची ए पी टी आय संस्थेच्या केंद्रीय कार्यकारी समितीवर निवड
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील रहिवासी असलेले आणि सद्यस्थितीत लातूर येथील चनबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सचिन घोळवे यांची असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल टीचर्स ऑफ इंडिया या संस्थेच्या केंद्रीय कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीवर संपूर्ण देशभरातून एकूण 28 फार्मसी शिक्षकांच्या कार्यकर्तृत्व अनुसार निवड केली जाते.
फार्मसी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल डॉक्टर सचिन घोळवे यांची मराठवाडा विभागातून या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून 2022 ते 2027 पाच वर्ष कालावधीसाठी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मिलिंद उमेकर यांनी ही निवड केली आहे.
भारतातील फार्मसी अध्यापन व शिक्षणाशी संबंधित सर्व समस्या हाताळण्यासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून एपीटीआय संस्थेची ओळख आहे. सर्वसाधारणपणे फार्मसी महाविद्यालयातील शिक्षकांच्या हिताचे रक्षण करणे, फार्मसी शिक्षकांना एका व्यासपीठावर आणणे, आणि फार्मसी व्यवसायात दर्जेदार शिक्षण देण्याच्या साठी पद्धती आणि तंत्र विकसित करण्यावर नियमित चर्चा करणे, तसेच सर्वोत्कृष्ट शिक्षक, प्राचार्य आणि संशोधक त्यांच्या फार्मसी शिक्षण आणि संशोधनातील योगदानाबद्दल सन्मानित करणे. ही या संस्थेचे महत्त्वाचे ध्येय धोरणे आहेत.
सदर समितीवर नियुक्त होणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. म्हणूनच डॉक्टर घोळवे यांच्या नियुक्तीने विभागातील फार्मसीक्षेत्राचा एका अर्थाने सन्मान समजला जात आहे. या निवडीबद्दल पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्टचे सचिव भीमाशंकर देवणीकर ,प्राचार्य डॉक्टर संजय धोंडे ,प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश भोसले व सर्व प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवाराच्या वतीने घोळवे यांचे कौतुक केले जात आहे.