उदगीर शहरातील प्रभाग क्रं १२ मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

उदगीर शहरातील प्रभाग क्रं १२ मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

उदगीर [ प्रतिनिधी ] : उदगीर शहरातील प्रभाग क्रं १२ मधील बनशेळकी रोड येथे महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते बरकत नगर व मदिना मस्जिद परिसरातील रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले .
या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष समीर शेख , शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, माजी जि . प . सदस्य ज्ञानेश्वर पाटील , अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस अजिम दायमी, सेवादलाचे मराठवाडा अध्यक्ष नवनाथ गायकवाड, युवक प्रदेश सरचिटणीस इम्तियाज शेख , अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी, माजी नगरसेवक शमशोद्दीन जरगर अनिल मुदाळे, इम्ररोज हाशमी, इब्राहिम नाना पटेल, विलास शिंदे, पाशा मिर्झा बेग, जिल्हा उपाध्यक्ष अतिक शेख, मुतजिब शेख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अजहर मोमीन, शहराध्यक्ष इरफान सय्यद, शहर कार्याध्यक्ष सलीम शेख, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार, विजय भालेराव, सामाजिक न्याय विभागाचे उदगीर तालुकाध्यक्ष मुकेश भालेराव, कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, मदिना मस्जिदीचे सदर मुनीर मामू, मस्जिदचे इमाम मुसा मौलाना, शहर उपाध्यक्ष खिजर मोमीन, अक्रम जहागीरदार, शहराध्यक्ष बापू सोळुंके, सेवादलाचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, शहराध्यक्ष युवराज जोमदे, अलिम खुरेशी, अकबर जाफर साब आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे मुख्य सयोजक महम्मद जानीभाई सय्यद यांनी प्रस्ताविक केले . या वेळी उद्घाटक आ . संजय बनसोडे, अजिम दायमी व समीर शेख यांचे समोचित मार्गदर्शन झाले .
या वेळी प्रभाग क्र १२ मधील अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. तसेच संयोजक जानी भाई सय्यद यांच्या संपर्क कार्यालयाचे माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
विविध समाजोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ त्या भागातील काही नागरिकांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले, . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक फैयाज शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अखिल मोमीन, शेख सुलतान, शेख रिजवान, सय्यद शारुख शेख अब्दुला, निजाम शेख, शेख अकबर, बागवान युसुफ, पठाण मुज्जू मामू, शेख शेरु, सय्यद शेरू, शेख कलिम, मदार परकोटे, राहुल कदम, लक्ष्मण मामडगे,अशोक कांबळे, शेख महेबुब, जाफर साब, शेख रज्जाक आदीनी परिश्रम घेतले.

About The Author