हडोळती येथील वेश्या व्यवसायावर छापा; तिन महिलेसह एका ईसमास अटक!
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील बाभळदरा रोड लगतच्या दोन मजली घरात वेश्याव्यवसाय चालत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तीन महिला व एका ईसमास ताब्यात घेण्यात आले.या घटनेमुळे अहमदपूर तालुक्यात एकच चर्चेला उधान आले.
याविषयी सविस्तर वृत्त असे की,अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांना गुप्त माहितीच्या आधारे हडोळती येथील बाभळदरा रोड लगत दोन मजली घरात वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे त्यांनी तक्रारदार पुंडलिक हाणमंतराव केंद्रे (वय ४५ )पो.ह.पोलीस स्टेशन अहमदपूर, प्रशिक्षणार्थी मपोउपनि चट, मपोका कोठेवाढ, पोना केंद्रे,चापोका आरदवाड यांना सोबत घेऊन हडोळती गाठली.तत्पुर्वी त्यांनी हडोळती येथील पोलीस चौकीतील पोका केंद्रे,व धुळगुंडे यांना या घटनेची सविस्तर माहिती देत एक बनावट ग्राहक तयार ठेवण्याचे आदेश दिले.हडोळतीत आल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहकास सविस्तर माहिती देऊन सदरील ठिकाणी पाठवले.सदर ठिकाणी बनावट ग्राहकाने तेथे उपस्थित एका ईसमास शरीर सुखासाठी महिलेची मागणी केली असता त्यांना सूल्याबाई उत्तम चव्हाण (वय ५०),हिना आमजद मिर्झा (वय ३५) व सिमा प्रेमकुमार शर्मा (वय ३५) या महिला दाखवण्यात आल्या.ठरल्याप्रकारे बनावट ग्राहकाने मिसकॉल देऊन ही माहिती पो.नि.कामठेवाड यांना कळवली.नंतर कामठेवाड यांनी आपल्या साथीदारांसह कमलबाई माधव राजपंगे यांच्या घरी छापा टाकला. या छाप्यात त्यांनी वेशाव्यवसाय करणाऱ्या तीन महिलेसह एका इसमास ताब्यात घेऊन २१०० रु.चा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला.
ऐन सणासुदीच्या दिवसात या या सेक्स स्कॅन्डलचा उलगडा झाल्यामुळे तालुक्यात एकच चर्चेला उधान आले होते.
असा झाला सेक्स स्कॅन्डलचा उलगडा
अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह हडोळती येथील पोलीस चौकीत कार्यरत असलेल्या पोलीस सहकाऱ्यांना एक बनावट ग्राहक तयार ठेवण्याचे आदेश दिले.हडोळतीत आल्यानंतर पो.नि. कामठेवाड यांनी बनावट ग्राहकास संपुर्ण माहिती देत ५०० रुपयांची नोट दिली.व त्यावर पंचाच्या सह्या घेऊन बनावट ग्राहकास सदर ठिकाणी पाठवले.त्यानंतर सदरील ठिकाणी गेल्याऐ तेथे उपस्थित एका ईसमास शरीर सुखासाठी महिलेची मागणी केली.यावेळी ५०० रु.दर ठरविण्यात आला.तेंव्हा बनावट ग्राहकाने जवळील ५०० रु.ची नोट त्या ईसमास दिली.तेंव्हा त्या ईसमाने वेशा व्यवसाय करणाऱ्या तीन महिला दाखवून त्यातील एकाची निवड करण्यास सांगितले.तेंव्हा ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने पोना केंद्रे यांच्या मोबाईलवर मिसकॉल करत ईशारा दिला.तेंव्हा पोलीस निरीक्षक कामठेवाड यांच्यासह साथीदाराने बाभळदरा रोड लगत असलेल्या कमलबाई माधव राजपंगे यांच्या दोन मजली घरी छापा टाकला असता त्यांना तळमजल्यावरील घरातील एका रुममध्ये पलंगाखाली लपवून ठेवलेल्या तीन महिला आढळल्या व बनावट ग्राहका जवळ पो.नि. कामठेवाड, दोन पंचाच्या सह्या असलेली ५०० रु.ची नोट सदर ईसमाजवळ आढळून आली.