आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते प्रकाश गालफडे रमाकांत संपत्ते यांच्यासह अनेकांना भाजपाचे नियुक्तीपत्र वाटप
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीत नव्याने पक्षप्रवेश केलेल्या पानगाव येथील अनेकांना पक्षाची जबाबदारी देण्यात आली असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते विविध पदांच्या नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी प्रत्येकाच्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळते मान सन्मान दिला जातो असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी पक्षप्रवेश करत असताना पानगाव येथील कार्यकर्त्यांना शब्द दिला होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारी भाजपाच्या संवाद कार्यालयात आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते अनेकांना विविध पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, तालुका अध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, अमर चव्हाण, गोपाळ शेंडगे, शिला आचार्य, भागवत गीते, गणेश तुरूप, माधव गुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस प्रकाश गालफडे, तालुका उपाध्यक्ष रमाकांत संपत्ते, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस अँड किशोर श्रीरगिरे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष गोविंद गोमारे, भागवत गडगिळे, विधी आघाडी तालुका सरचिटणीस अँड सुधाकर बोराडे, अनुसूचित जाती मोर्चा तालुका सरचिटणीस अँड रवी मोहिते, पानगाव शहर सरचिटणीस दिगंबर येडले आणि पानगाव युवा मोर्चा अध्यक्षपदी नवनाथ पांचाळ यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले तर आ. कराड यांच्या उपस्थितीत कमलाकर श्रीहरी वांगे, केशव ज्ञानोबा हरिदास, अक्षय विलास पेदे, सुनील आनगोटे यांनी भाजपात प्रवेश केला.