रमेशआप्पा यांच्यामुळे लातूर ग्रामीण मधील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला

रमेशआप्पा यांच्यामुळे लातूर ग्रामीण मधील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला

लातूर (प्रतिनिधी) : ग्रामीण मधील ७५ हजाराहून अधिक गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत दत्तक घेऊन त्यांना आरोग्याच्या सुविधा देण्याचे काम केले असून आत्तापर्यंत हजारो कुटुंबानी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते श्री. ऋषिकेशदादा कराड यांनी केले

लातूर एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय आणि रेणापूर तालुका भाजपा यांच्या वतीने रेणापूर तालुक्यातील मौजे शेरा येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन भाजपाचे युवा नेते माननीय ऋषिकेश दादा कराड यांच्या हस्ते शुक्रवारी झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीण भाजपचे अध्यक्ष अनिल भिसे, रेणापूरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, शिबिराचे संयोजक भाजपाचे तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक माऊली भिसे, श्रीकृष्ण पवार, अमर चव्हाण, अजित गायकवाड शेरा येथील दर्ग्याचे अध्यक्ष चाँदपाशा शेख, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अनुसया फड, शिवमूर्ती उरगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेरा गावचे आणि कराड कुटुंबीयांचे तीन पिढ्यापासून वेगळे नाते आहे आणि आजही ते कायम टिकून आहे. जात धर्म बाजूला ठेवून सर्व धर्म समभावाचे आणि मानवतेला पुढे घेऊन जाण्याचे कार्य शेरा ग्रामस्थ वर्षानुवर्ष करीत असल्याचे उद्गार काढून ऋषिकेश कराड म्हणाले की, भाजपाचे कार्यकर्ते समाजातील अडीअडचणी प्रश्न सोडविण्याचे काम सातत्याने करीत आहेत. कोरोना काळात मोठा दिलासा देण्याचे काम भाजपाने केले असून राजकारण हे निवडणुकी पुरते असायला हवे. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांच्या आजाराचे निश्चितच निदान होईल. गरज पडल्यास त्यांच्यावर पुढील उपचार यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात केले जातील असे सांगून आजारावर निश्चितचपणे उपचार होऊ शकतो मात्र आजारच होणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असेही आव्हान ऋषिकेश कराड यांनी केले.

माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आरोग्य शिबिरे गोरगरीब जनतेला दिलासा देणार आहे असे बोलून दाखविले तर शिबिराचे संयोजक अँड दशरथ सरवदे यांनी शिबिराच्या आयोजना मागची भूमिका विशद करून शिबिराचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

शेरा येथील दावल मलिक बाबा दर्गाह परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात जनरल मेडिसिन, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग शल्यचिकित्सा यासह विविध आजाराचे यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर यांच्याकडून तपासणी केली जात आहे. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी देवतेची पूजा करण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सदरील कार्यक्रमापूर्वी युवा नेते मा. ऋषिकेश दादा कराड यांनी शेरा येथील ग्रामदैवत दावल मलिक बाबा दर्गाह येथे चादर चढून दर्शन घेतले तत्पूर्वी तरुणांनी स्थापन केलेल्या गणरायाची आरती केली या उद्घाटन कार्यक्रमास प्रताप भुरे, बापू कुलकर्णी, बालाजी कस्पटे, सिकंदर शेख, दत्ता जोगदंड, दिलीप यादव, रानबा मुळे, बाबासाहेब जोगदंड, विकास सरवदे, विपुल चेपट, मधुकर भुरे, कल्याण भुरे, प्रभाकर देडे, बाबू शेख, महादेव सोनवणे, बलभीम कांबळे, श्याम बांगड, शुभम लोखंडे, श्याम गायकवाड, अविनाश बोराडे, नरेश चपटे, वसंत भुरे यांच्यासह शेरा आणि परिसरातील भाजपा कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author