मधुमेह मुक्त होण्यासाठी दोन वेळा जेवण व गोपाळकाला आवश्यक – मुगुटकर
उदगीर (प्रतिनिधी) : फक्त तीनच महिन्यात मधुमेह मुक्त होण्यासाठी दोन वेळा जेवण व गोपाळकाला आवश्यक आहे.हा प्रयोग स्वतः करून मी मधुमेह मुक्त झालो असल्याची माहिती ७८ वर्षाचे असलेले व्याख्याते निशिकांत मुगुटकर(बार्शी)यांनी दिली.
उदगीर येथील योग निसर्गोपचार आरोग्य संस्कार मंदिराच्या ‘संयम’ च्या ‘डायबेटीस हरला-मी जिंकलो’या विषयावर मुगुटकर यांचे मंगळवारी व्याख्यान झाले.
याप्रसंगी त्यांनी दिवसातून फक्त दोन वेळा पोटभर जेवण करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक डॉ. सुरेश गरड यांनी केले.
पुढे बोलताना व्याख्याते मुगुटकर म्हणाले की, तीन महिन्यांसाठी, दिवसातून फक्त दोन वेळा पोटभर जेवण करावे, कडक भूक लागण्याच्या दोन वेळा निश्चित कराव्या, दोन जेवणामध्ये ८ ते ९ तासाचे अंतर ठेवावे, या मधल्या काळात काहीही खायचं नाही,काही खायची इच्छा झाल्यास पाणी किंवा दोन चमचे दह्याचे पाणी घालून केलेले ताक किंवा एक टोमॅटो किंवा नारळ पाणी घ्यावे, हा उपाय तीन महिने अगदी काटेकोरपणे केल्यास वजन कमी होतें, पोटाचा घेर कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मधुमेह (डायबिटीस )मुक्त होऊ शकतो.
जेवणात शक्यतो गोड पदार्थ घेऊ नयेत,जेवण जास्तीत जास्त ५५ मिनिटात पूर्ण व्हावे, आपल्या शरीराला आवश्यक असणारे इन्सुलिन ५५ मिनटात आवश्यक असणारे एक माप तयार करते. त्यानंतर आपण काहीही खाल्ले की इन्सुलिनचे दुसरे माप तयार होते.ज्याची शरीराला गरज नसते. ठराविक वेळी केलेल्या दोन जेवणामुळे आवश्यक तेवढे इन्सुलिन तयार होते. योग निसर्गोपचार तज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी असेही म्हटले आहे की, आयुर्वेद, वेगवेगळे धर्म यांच्या नुसार जो एक वेळा जेवतो तो योगी, दोन वेळा जेवतो तो भोगी आणि तीन वेळा जेवतो तो रोगी.
एकदा जेवण करणाऱ्याला आरोग्य मिळते, दोन वेळा जेवतो त्याला शक्ती मिळते, तीन वेळा जेवतो त्याला रोग मिळतात आणि चार वेळा जेवतो त्याला मरण मिळते.असे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. सुरेश गरड यांनी जेवताना एका वेळी एक आहार म्हणजे सकाळी भाकरी खाल्ली तर संध्याकाळी भात खावा. जेवण शक्यतो गोपाळकाला या पद्धतीने खावे.त्यात पालेभाज्या, काकडी,टोमॅटो, वरण, मुळा, फ्लॉवर यांचा भाकरी सोबत काला करुन खावा. या दोन देवदूत रुपी डॉक्टर्स मुळे आज तीन महिन्यात मी मधुमेह (डायबिटीस )मुक्त झालो. व मी जिंकलो.असल्याचे व्याख्याते मुगुटकर म्हणाले. आभार प्रदर्शन कृष्णकांत पत्की यांनी केले.