मतदान आधारकार्ड जोडणीची मोहीम जोरात

मतदान आधारकार्ड जोडणीची मोहीम जोरात

उदगीर (एल.पी. उगीले) : उदगीर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची मतदान ओळखपत्रास आधार लिंक करणे संदर्भात प्रविण मेंगशेट्टी, उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्या अध्‍यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्‍ये उदगीर तालुक्यातील एकूण २३७ केंद्र स्‍तरीय अधिकारी उपस्थित होते.

त्यापैकी खालील मतदान केंद्र स्‍तरीय अधिकारी यांनी मतदान ओळखपत्रास आधार लिंकिंग मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन प्रविण मेंगशेट्टी, उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बोळेगावे गंगाधर नागनाथ, डीगे शिवलिंग प्रभाकर , रवि यादवराव सोनकां‍बळे चुळबुळकर पांडुरंग तुकाराम, पाचांळ संजीवकूमार बाबूराव, बिरादार विठठल पिराजी, जी एम मधाळे, चिखले संजय जी,
सलिम फसीयाद्दीन उस्ताद, मुंढे वसंत रंगनाथराव
भारत निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्रा सोबत आधार लिंक करण्याची सर्वव्यापी विशेष मोहीम आयोजित केलेली आहे. त्याअनुषंगाने उदगीर तालुक्यात दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान ओळखपत्रास आधार लिंक करणे संदर्भात सर्व गावांमध्ये विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.
सदरील दिवशी सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, आपण आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपले मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करून घ्यावे. असे तहसील कार्यालय उदगीर (निवडणूक विभाग) यांच्यामार्फत आवाहन करण्यात येत आहे. तसेच जे मतदार दिनांक १५ सप्‍टेंबर २०२२ रोजी पर्यंत मतदान ओळखपत्राशी आधार लिंक करणार नाहीत अशा मतदारांची नावे मतदान यादीतून वगळण्‍याची शक्‍यता आहे.
सर्व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांना सूचना देण्यात आले की, आपण मतदान ओळखपत्रास आधार लिंकिंग मोहिमेची व्यापक प्रसिद्धी देऊन आपल्या गावातील सार्वजनिक लाऊड स्पीकर वरून मतदारांना आवाहन करावे. तसेच रास्त भाव दुकानदार यांना निर्देश देण्यात आले की, आधार लिंकिंग मोहिमेमध्ये आपण सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची योग्य ती मदत करावी.

About The Author