अतनुरात एक गाव एक गणपती उपक्रम; तंटामुक्त गाव समितीचा निर्णय

अतनुरात एक गाव एक गणपती उपक्रम; तंटामुक्त गाव समितीचा निर्णय

अतनूर (प्रतिनिधी) : गणेशोत्सव सुरू होत असून एका मंडळांनी गणपती बसविला म्हणून दुसऱ्यांनेही बसवायचा अशी स्पर्धा केल्याने गावात तंटे वाढून कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. हे पाहता जळकोट तालुक्यातील अतनूर गावाने एक गाव एक गणपती उपक्रम राबविला याचे सर्व श्रेय तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील यांना जाते. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात तंटामुक्त गाव समितीची बैठक बोलविण्यात आलेले होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील प्रकाश पाटील होते. तर जळकोट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ये.व्ही.कांबळे व अतनूर बीटचे अंमलदार एस.जी.गुडाप्पे, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील उपस्थित होते. यावेळी ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना उत्सव साजरा करायचा आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी. यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी आवश्यक आहे. तसेच विद्युत पुरवठ्यांसाठी महावितरणकडून तात्पुरते मीटर बसून घ्यावे, कोठेही डीजे लावू नये, आवाजाची मर्यादा ओलांडल्यास पोलीस प्रशासन कारवाई करेल अशा सूचना करण्यात आल्या. गाव पुढार्‍यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली. यासाठी पोलीस पाटील व सरपंचांनी दक्ष राहिले पाहिजे. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे देखावे, फलक लावू नयेत, असे आवाहनही यावेळी पोलीसाच्या व तंटामुक्ती गाल समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी गोविंद बारसुळे, सुधाकर बाबर, संजय बोडेवार, विरभद्र मठदेवरू, सुदर्शन कदम, कमलाकर सोमुसे, धनाजी गव्हाणे, योगेश गव्हाणे, श्रीकांत बोडेवार, कल्पेश हिंगमिरे, रवी पांचाळ, मुक्तेश्वर पाटील, तंटामुक्ती समितीचे सदस्य बालासाहेब शिंदे, चेतन कांबळे, माजी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष ईस्माईलसाब मुंजेवार, पोहेकॉ.जी.एस.गुडाप्पे, एएसआय ये.व्ही.कांंबळे, ईश्वर कुलकर्णी, गोविंद कोकणे, संग्राम घुमाडे उपस्थित होते.

About The Author