चिकली (यु) प्रशालेत प्रतिभा कारंजी बाल महोत्सव उत्साहात संपन्न

चिकली (यु) प्रशालेत प्रतिभा कारंजी बाल महोत्सव उत्साहात संपन्न

कमालनगर (एल.पी.उगीले) : सीमाभागातील कमालनगर तालुक्यातील दापका केंद्रामधील सरकारी उच्च प्राथमिक शाळा चिखली (यु) येथे प्रतिभा कारंजी बाल महोत्सव उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक बाजीराव राजेवाले हे होते, तर उद्घाटक म्हणून शिवाजी बेंदरवाड व प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक भानुदासजी वासरे, प्राथमिक शिक्षण संयोजक संजीवजी म्हेत्रे, संतोष रेड्डी, नईमुद्दीन शेख, केंद्रप्रमुख रमेश आडे, विवेकानंद ढगे, सौ. सुनंदा कोंगे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील, संदीप आडे,कवि रणजीत शिंदे, प्रकाश बर्दापुरे, प्रवीण कुमार, पत्रकार अंकुश वाडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारी उच्च प्राथमिक शाळा चिखली (यु) येथे प्रतिभा कारंजी बाल महोत्सव उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक शिवाजी बेंजरवाड बोलताना म्हणाले की, चिखली(यु)प्रशालेने स्तुत्य अशा कार्यक्रमाचे अत्यंत आखीव व रेखीव आयोजन करून विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना जागृत करण्याचे अत्यंत जबाबदारीचे कार्य पार पाडलेले आहे. तसेच प्रमुख अतिथी प्राथमिक शिक्षण संयोजक संजीवजी म्हेत्रे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यात एक कलावंत दडलेला असतो. त्या अनुषंगाने प्रत्येक शिक्षकाने कार्य केले पाहिजे, कवी रणजीत शिंदे यांनी आपल्या काव्यमय शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर बी.आर.पी. संतोष रेड्डी यांनी सुद्धा शाळेच्या आयोजनाचे कौतुक करून अभ्यासासोबतच कला व छंद जोपासण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तर सी.आर.पी. प्रकाश बर्दापुरे यांनी अत्यंत मनोरंजक व खेळीमेळीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक  बालाजी रेड्डी, राजेंद्र लष्करे,  व्यंकटराव भालके,  मनोहर पांचाळ, चंद्रकांत लिंबूचे, सौ. सुवर्णा स्वामी, भीमराव तेलंगे, सोपानराव सावळे,  विष्णुकांत हादवे,  सुखदेव बिरादार,  दिगंबर कलुबोने, मधुकर खंदाडे,  नागनाथ बिरादार,  सुरेश देवकते, सौ.रचना ,  श्रीकांत रेड्डी,  गणेश जाधव, संजीव बिरादार,  सचिन शिंदे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुसया भोसले तर आभार पायल चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती. सुलक्षणा रेड्डी यांनी केले.

About The Author