संभाजी ब्रिगेडची साथ शिवसेनेसाठी लाखमोलाची – चंद्रकांत टेंगेटोल
उदगीर (एल.पी. उगिले) : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षांची युती शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. असे विचार शिवसेनेचे उदगीर तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी व्यक्त केले. ते शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे येथील नेत्यांची गाठीभेटीच्या आयोजन प्रसंगी बोलत होते.या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर शिवसेना पुन्हा एकदा नव्या दमाने आपले वर्चस्व सिद्ध करणार आहे. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राजकुमार माने, शिवसेना विधानसभा प्रमुख श्रीमंत सोनाळे, कैलास पाटील, देवा घंटे, अंकुश कोनाळे, शिवकांत चटनाळे, मुन्ना पांचाळ, अनिल पंचाक्षरी, विष्णू भाई चिंतलवार, अंकुश ताटपले, प्रदीप पाटील मोरतळवाडी, शाम तवर, व्यंकट साबणे, संजय मठपती, राजेश चव्हाण, व्यंकट थोरे, गणेश मुंडकर, शेख शेरू, बालाजी कसबे, मलंग इंजिनिअर, बाबासाहेब एकुरकेकर, सय्यद मेहबूब, सावंत तोरणेकर, जितेंद्र मादलापुरकर, संजय सूर्यवंशी, सौ अनिता जाधव, खाजा शेख, अनिल मोरे, जावेद कादरी, प्रदीप पाटील, सखाराम गुराळे, रामदास काकडे, लखन घोणसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना चंद्रकांत टेंगेटोल म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसैनिकासाठी कायम श्रद्धेय आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणताही अपशब्द कोणताही शिवसैनिक ऐकून घेणार नाही. याची जाणीव ठेवून वक्तव्य करावे. अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल. शिवसेना पुनर्बांधणीला वेळ लागणार नाही. जे गद्दार होते ते गेले. याबद्दल कोणालाही कसलीही खंत नाही, असेही त्यांनी सांगितले.