लाल बहादूर शास्त्री विद्यालयात पर्यावरण पूरक ‘श्री’ ची उत्साहात प्रतिष्ठापना

लाल बहादूर शास्त्री विद्यालयात पर्यावरण पूरक 'श्री' ची उत्साहात प्रतिष्ठापना

उदगीर : येथील लाल बहादूर शास्री माध्यमिक विद्यालयात सकाळी ठीक ९ वाजता संकुलाचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार व त्यांच्या सुविज्ञ पत्नी विद्यालता वट्टमवार, शालेय समितीचे अध्यक्ष संतोषराव कुलकर्णी व त्यांच्या सुविद्य पत्नी छाया कुलकर्णी तसेच विद्यालयाचे शिक्षक सुनिल ढगे व त्यांच्या सुविद्य पत्नी वैष्णवी ढगे यांच्या शुभ हस्ते पर्यावरणपूरक ‘श्री’ ची प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली.
याप्रसंगी विविध स्तोत्र ,श्लोक व आरत्या चे गायन प्रीती शेंडे व विद्यार्थ्यांनी केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी ,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर, लालासाहेब गुळभिले,माधव मठवाले तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उत्साहात उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे ऋणनिर्देश अनिता मुळखेडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार , विनायक इंगळे, गुरुदत्त महामुनी, मनोज भंडे, संतोष कोले,विष्णू तेलंग,पंकज देशमुख ,राजकुमार म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!