रोटरी क्लबने घेतली इको फ्रेंडली बप्पा बनविण्याची कार्यशाळा; माऊंट लिटेरा झी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
उदगीर (ता.प्र.) येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व माऊंट लिटेरा झी स्कूल उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी इको फ्रेंडली बप्पा बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी इको फ्रेंडली पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा रोटरी सदस्य डॉ. संतोष पांचाळ यांनी घेतली. यात ४० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी आकर्षक व रेखीव असे गणेशमूर्ती तयार केले. यावेळी डॉ. पांचाळ यांनी, विद्यार्थ्यांनी आपण स्वतःच्या हातानी तयार केलेला इको फ्रेंडली गणपती बाप्पा आपल्या घरी स्थापन करून पर्यावरणाचे संरक्षण करावे असे आवाहन केले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष रामेश्वर निटुरे, सचिव व्यंकटराव कणसे, संस्थेच्या सचिव तथा रोटरीच्या उपाध्यक्षा ज्योती चौधरी, महानंदा सोनटक्के, प्रा. मंगला विश्वनाथे, अन्नपूर्णा मुस्तादर, सरस्वती चौधरी, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. सायराम श्रीगिरे, अनिल मुळे, गजानन चिद्रेवार, रविंद्र हसरगुंडे, नागेश आंबेगावे सह शाळेचे प्राचार्य रोशन डिकोना, कल्पना सिंदबंदगे, संदीप पवार, अब्दुल बसीर, शोभा इंगळे, दामिनी कुलकर्णी, मनोज गायकवाड आदी उपस्थित होते.