बाल शिल्पकारांनी साकारले पर्यावरण पूरक गणेशमूर्ती
उदगीर (प्रतिनिधी) : लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय,उदगीर येथे गणेशउत्सवा निमित्त पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणे कार्यशाळा घेण्यात आली. आकर्षक,रेखीव असे गणपती शाडू मातीपासून तयार केले. यात 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कलाशिक्षक गुरुदत्त महामुनी यांनी विद्यार्थ्यांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. याप्रसंगी मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर,लालासाहेब गुळभिले,माधव मठवाले, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार,विनायक इंगळे, नीता मोरे,विश्वजीत श्रीखंडे, शरद पवार, संतोष कोले उपस्थित होते.
याप्रसंगी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार,केंद्रीय समिती सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुने, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.. या कार्यशाळेस विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.