भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गोविंद गिरी

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गोविंद गिरी

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले गोविंद भगवानराव गिरी यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतिच निवड झाली आहे. गेली अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात गोविंद गिरी यांचे उल्लेखनीय असे काम असल्याने त्या कामाची दखल घेऊन त्यांची लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टी च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडीचे पत्र भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड यांच्या हस्ते व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केंद्रे यांच्या उपस्थितीत नुकतेच देण्यात आले आहे. गोविंद गिरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक वर्षे काम केले आहे गेल्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. केलेल्या कामाची दखल घेऊन आज गोविंद गिरी यांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गोविंद गिरी यांच्या निवडीबद्दल अहमदपूर तालुक्यासह जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

About The Author

error: Content is protected !!