अहमदपूर केंद्राचे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : दि 2/9/2022 रोजी पंचायत समिती शिक्षण विभाग अहमदपूर अंतर्गत अहमदपूर केंद्रांतील शाळांचे विज्ञान प्रदर्शन येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घेण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटातील एकोणीस (19) शाळांनी सहभाग नोंदवला तर माध्यमिक गटातील सोळा(16) शाळांनी विविध प्रयोगाच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या एका एका प्रतिनिधींनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी मांडली.
केंद्रांतर्गत या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदपूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नंदकुमार कोनाले यांच्या हस्ते फीत कापून झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, मुख्याध्यापक आशा रोडगे, लीनेस क्लबच्या अध्यक्षा मीना तोवर, निरीक्षक म्हणून महात्मा फुले महाविद्यालयाचे प्रा. आर.डी.तोरणे सर, महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रा.बी.एस.वलसे सर उपस्थित होते. परीक्षक प्राध्यापक महोदयांनी सर्व मांडलेल्या प्रयोगांचे निरीक्षण करून सादरकर्त्या विद्यार्थ्यांची चर्चा करून प्राथमिक गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी तीन शाळांच्या प्रयोगाची निवड केली. आणि माध्यमिक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या तीन प्रयोगांची निवड केली.
समारोप समारंभाच्या आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचा संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहमदपूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नंदकुमार कोनाले यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले.
गुणानुक्रमे विजेत्या प्रयोगाचे विद्यार्थी व शाळांची नावे पुढीलप्रमाणे. प्राथमिक गट 1) सय्यद नूर मोहम्मद इब्राहिम छत्रपती शाहू प्राथमिक विद्यालय अहमदपूर— मार्गदर्शक:- शिक्षक श्री मरवले बी.पी. 2)होळकर हरी हनुमंत जि प प्रा शा चिलखा तालुका अहमदपूर— मार्गदर्शक शिक्षिका:- श्रीमती कुदळे मॅडम 3) सांगोळे माही उल्हास संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा अहमदपूर– मार्गदर्शक शिक्षिका:- श्रीमती तोवर एम. आर.
माध्यमिक गट
1) वलसे अर्जुन बालाजी यशवंत माध्यमिक विद्यालय अहमदपूर — मार्गदर्शक शिक्षक:- श्री हुडे सर
2) सय्यद हमजा शरीफ एस ए जागीरदार हायस्कूल काळेगाव– मार्गदर्शक शिक्षिका:- सिद्धकी जी.के.
3) गुळवे श्वेता चांदोबा जिल्हा परिषद प्रशाला अहमदपूर– मार्गदर्शक शिक्षिका:- श्रीमती मुळे व्ही.एन.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमतीआशा रोडगे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन श्री सतीश साबणे सर यांनी केले तर आभार मीनाक्षी तोवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.