धनंजय मुंडे यांच्या हस्ते १ कोटी ४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण व उदघाटन सोहळा !

धनंजय मुंडे यांच्या हस्ते १ कोटी ४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण व उदघाटन सोहळा !

अहमदपूर (गोविंद काळे) : सताळा खु. ता. अहमदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांचा लोकार्पण व उदघाटन सोहळा आज राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री मा. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मा.धनंजय मुंडे यांचे स्वागत करून त्यांचा समस्त अहमदपूर चाकूरकरांच्या वतीने यथोचित सन्मान केला.

अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या आमदार निधीतुन मंजुर केलेल्या मुलभुत सुविधा अंतर्गत एकुण ३० लक्ष रुपयाचे दत्त नगर येथिल सिमेंट रस्ते, मनरेगा अंतर्गत तीन शेतरस्ते खडीकरण व मजबुतीकरण करणे : एकुण ३६ लक्ष रुपये, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील स्वच्छतेसाठी मंजुर : १३ लक्ष रु, १५ वित्त आयोगातुन मंजुर बंदीस्त व अबंदीस्त निधी २५ लक्ष रु. अशा एकुण १ कोटी ४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व उदघाटन पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सुवर्णाताई बैकरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विलास पाटील चाकूरकर, माजी जि.प सदस्य सुदर्शन मुंडे, इंद्रजित बैकरे सर, सभापती शिवानंद हेंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प सदस्य माधवराव जाधव, सुंदरराव साखरे, सतीश नवटक्के, इमरोज पटवेकर, याकूब शेख, गोपीनाथ जोंधळे, धनराज बोडके, ॲड. सादिक शेख, दयानंद पाटील, शाम पाटील, शिवदास बिडगर, दिलदार शेख, नबी सय्यद, मोहनराव पाटील, सचिन पडिले, ज्ञानोबा बोडके, धमानंद कांबळे, शेखर चौधरी, विवेक शिंदे, नितीन शिंदे, शशिकांत शिंदे, भरत शिंदे, विष्णू आदटराव, श्रीकांत मजगे, इमरोज पटवेगर, फेरोज शेख, ॲड. अलिम घुडन साब , डॉ.महालांकर पंडितराव, गणेश शिंदे, नरसिंगराव महालनकर तसेच सताळा खु. चे ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!