स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन तरुणांनी समाजाची उंची वाढवण्याचे कार्य करावेत – ह.भ.प. गीतांजली झेंडे
उदगीर (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस तरुण वाईट व्यसनाला लागला असून आपल्यातील वाईट दोष काढून नव तरुणांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन तरुणांनी समाजाची उंची वाढवण्याचे कार्य करावेत. असे मत मनमंदिर फेम टॉकीज कीर्तनकार सौ गीतांजलीताई झेंडे (कुलकर्णी) यांनी व्यक्त केले. त्या उदगीर येथे नाईक चौकातील नाईक चौकाचा राजा गणपती, स्वामी विवेकानंद युवक मंडळ गणेश उदगीर येथे आयोजित केलेल्या कीर्तनात त्या बोलत होत्या.
त्यापुढे म्हणाल्या की, स्वामी विवेकानंद तारुण्यांचे प्रेरणास्थान होते, त्यांच्या कार्यांचा गौरवा बरोबरच झेंडे ताईंनी अष्टविनायका पैकी बल्लाळेश्वर या गणरायांची माहिती देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध करून त्यांची मने जिंकली.
आता संस्काराबरोबरच भक्तीततल्लीन होणे ही काळाची गरज असून, तरुण भक्तीत रमला की तो चांगले कार्य करत असतो. तरुणांनी आता या काळात भगवंतांची भक्ती केली तर वाईट गुणांचा नाश होऊन भक्तिमार्गाचा अवलंब स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. असेही त्या म्हणाल्या.
आता यापुढे तरुणांनी ईश्वर भक्ती, देशभक्ती, मातृ-पितृ भक्तीचा अवलंब करण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. आपल्या या सुश्राव्य मंगल वाणीतून त्यांनी जनतेला समतेचा, ममतेचा, संस्कृतचा, भक्तिमार्गाचा मार्ग दाखवला.
सर्वांनी आहे ते जीवन सुखी समाधानी जगण्याचा मौलिक सल्ला दिला. या कीर्तन सोहळ्याप्रसंगी संत कबीर वारकरी भजनी मंडळांनी खूप चांगली साथ दिली. या बालकांचे कौतुक करून अंजलीताईंनी शुभेच्छा दिल्या. तर स्वामी विवेकानंद युवक गणेश मंडळाच्या सर्वच आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे भरभरून कौतुक करून या युवक गणेश मंडळाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व झेंडे ताई यांचा सत्कार करण्यात आला. या कीर्तन सोहळ्यास भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कीर्तन सोहळ्याचे संचलन सुभाष तगाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ह.भ.प. सुनील महाराज जवळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.