महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात नॅक पिअर टीमची पाहणी पूर्ण

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात नॅक पिअर टीमची पाहणी पूर्ण

उदगीर – येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयास दिनांक 1 व 2 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय अधिस्वीकृती व मूल्यांकन परिषदेची समिती भेट देवून भौतिक सुविधा, शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी महाविद्यालय कोणत्या पध्दतीने कार्य करते, पालक व माजी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते याबाबतची पाहणी समितीने केली. महाविद्यालयातील भौतिक सुविधा, विविध विभाग, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा विभाग, इनडोअर स्टेडियम, वस्तीगृह, प्रशासन व कार्यालयाची पाहणी केली. आजी-माजी विद्यार्थी, व्यवस्थापन मंडळ, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.आर.डब्ल्यू. अलेक्झांडर जेसुदासन हे होते तर समन्वयक सदस्य आंध्र प्रदेशातील श्री. व्यंकटेश्वरा विद्यापीठ, तिरुपतीचे व्यवस्थापन विभागाचे प्रा. डॉ.श्रीनिवास रेड्डी , सदस्य म्हणून कोटायम केरळचे प्राचार्य डॉ. राजू जॉर्ज यांचा समावेश होता. समितीने आपला अहवाल एक्झिट मीटिंगमध्ये प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांच्याकडे सुपूर्द केला. एक्झिट मीटिंगसाठी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी व अ‍ॅड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अ‍ॅड.एस.टी.पाटील व डॉ.आर.एन.लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, सदस्य बसवराज पाटील नागराळकर, मनोहरराव पटवारी, प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, नॅक समन्वयक प्रा.डॉ.के.आर.गव्हाणे तथा सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांनी समितीचे स्वागत केले तर प्रा.डॉ.के.आर.गव्हाणे यांनी एक्झिट मीटिंग चे सूत्रसंचालन आणि आभार मांडले.

About The Author