नवनाथ गायकवाड यांचा सत्कार संपन्न

नवनाथ गायकवाड यांचा सत्कार संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने धडपड करणारे चर्मकार समाजाचे नेते व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाज उदगीर तालुक्याच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ लातूर ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा सौ. उर्मिला वाघमारे, पंडितराव सूर्यवंशी, नरसिंग सदानंदे, सुरेश झिल्ले, मारोती भुजबळे, गंगाधर गिरगावकर, सुनील गायकवाड, माधव कल्याणकर, बालाजी माने, संग्राम अमिलपुरे, बजरंग वाघमारे, प्रा.सौ. पुष्पा गायकवाड, सौ. रुक्मिणी‍ शिंदे, सौ. जयश्री टिळेकर, सौ. वसंती ईदलगावे, सौ. सरस्वती वाघमारे, सौ बबीता वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या समाजातील उमदा तरुण ध्येयवेडा होऊन समाजातील लोकांच्या अडीअडचणी सातत्याने सोडवत असतात. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून समाजातील गुणवंतांचा सत्कार, राष्ट्रसंत गुरू रविदास महाराज जयंती असेल किंवा अनेक समाजोपयोगी उपक्रम नेहमी राबवून समाजातील मुला- मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतात. कसलाही राजकीय वारसा घरात नसताना स्वकर्तृत्वाने राजकारणात भरारी घेणारा आमच्या समाजाचा नेता म्हणून समाज ताठ मानेनं अभिमानाने सांगतो. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करताना अभिमान वाटतो असे समाजबांधव गौरवोद्गार काढून भावी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर नाबदे तर आभार पांडुरंग वाघमारे यांनी मानले
या सत्कार प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!