गणेशोत्सव पेट्रोलिंग दरम्यान अट्टल परप्रांतीय मोबाइल चोरास Unit-2 ने पकडून चोरीतील 2 महागडे मोबाइल केले हस्तगत, जबरी चोरीचा 1 गुन्हा उघड
पुणे (रफिक शेख) : पोलीस उप-आयुक्त सो, गुन्हे पुणे शहर यांचे आदेशन्वये Unit-2 कडील PSI नितीन कांबळे, सोबत HC शंकर नेवसे, HC रेश्मा उकरंडे, HC मोहसीन शेख, PN प्रमोद कोकणे याना गणेशोत्सव अनुषंगाने परिमंडळ-2 हद्दीत छेडछाड व टिंगल-टवाळी प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करिता नेमण्यात आले आहे. दरम्यान दि. 03/09/22 रोजी रात्री 21.00 वा. सुमारास वरील स्टाफ बंडगार्डन पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना Unit-2 कडील HC मोहसीन शेख व PN प्रमोद कोकणे यांना त्यांचे बतमीदारामार्फत पुणे स्टेशन PMT बस स्टॉप येथे एक इसम संशयस्पदरीत्या थांबला असून तो येणाऱ्या जाणाऱ्या बस मध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी बातमी मिळाली. सदरबाबत Unit-2 प्रभारी व.पो.नि. क्रांतिकुमार पाटील याना कळवले असता, त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे वरील स्टाफ ने बातमी ठिकाणी धाव घेत प्राप्त वर्णनावरून संशयित इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता, त्याने प्रेमकुमार ब्रम्हय्या पी वय-24 रा. ग्रीनपार्क, L.B. नगर, जि. रंगारेड्डी, हैद्राबाद राज्य- कर्नाटक असे असल्याचे सांगितले. त्याचे अंगझडतीत त्याचे पँटच्या खिशात Redmi-1, Vivo-1 असे 2 मोबाईल मिळून आले. त्यानंतर नमूद आरोपीस Unit-2 कार्यालयात आणून आणखी कसून तपास करता, त्याने सदरचे मोबाइल म.न.पा. बस स्टॉप येथे गर्दीत जबरी चोरी केल्याची कबुली दिली असून, त्याअनुषंगाने शिवाजीनगर पो.स्टे. कडे चौकशी करता, शिवाजीनगर पो.स्टे. CR No 135/22 IPC 392 प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे समजल्याने आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाही कामी शिवाजीनगर पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या मोबाइलच्या मूळ मालकाचा शोध घेऊन पुढील कारवाई करीत आहोत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली PSI नितीन कांबळे, पो.अं. शंकर नेवसे, रेश्मा उकरंडे, प्रमोद कोकणे, संजय जाधव, मोहसीन शेख, यांनी केलेली आहे.