सण,उत्सवामध्ये सामाजिक ऐक्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी – प्रा.सिध्देश्वर लांडगे
कमालनगर (प्रतिनिधी) : दापका येथे माध्यमिक शाळेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व गणपती महोत्सव निमित्ताने जाहीर व्याख्यान शासकीय माध्यमिक विद्यालय दापका चवर येथे संपन्न झाले. यावेळी व्याख्याते प्रा.शिवश्री सिद्धेश्वर लांडगे म्हणाले, अमृत महोत्सव म्हणून स्वातंत्र्य साजरे करणे चांगलेच पण..आजही धर्मांधता, जातियता, अर्थिक विषमता, बेरोजगारी, महागाई, खाजगीकरण, भ्रष्टाचार यासारखी आव्हाने निर्माण झाली आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर बंधने घातली जात आहेत, म्हणून येणाऱ्या काळात राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सण, उत्सव व्यावसायिकते कडे न जाता, सुसंस्कृत संस्कृतीनी व सामाजिक ऐक्याने साजरे करणे हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांने व तरूणांनी जागरूक राहून राष्ट्रीय चारित्र्य अंगीकृत केले पाहिजे.विद्यार्थी व तरूण उद्याचे देशाचे भविष्य आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी जागृत राहून आवडत्या क्षेत्रात यशस्वी सर्वोच्च बनावे .असा सल्ला दिला.
यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास वासरे व प्रमुख अतिथी गावातील ज्येष्ठ नागरिक माजी मुख्याध्यापक माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भूविकास बँकेचे संचालक विलासराव भाऊराव जाधव व शालेय समितीचे अध्यक्ष अंकुश लक्ष्मणराव वाडीकर, भगवानराव जाधव , शिवाजीराव शिगरे शिक्षक, ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच दापका गणेशजी मुंडकर, संजीव पोतले, पांडुरंग लंगोटे, दिगंबर वाडीकर आदी मान्यवर होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक मुख्याध्यापक भानुदास वासरे यांनी केले. माध्यमिक शाळेची स्थापना 1962 या इसवी सन मध्ये झालेली आहे. आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत, कित्येक डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रांमध्ये हजारो कर्मचारी झालेले आहेत.
शाळेचा विद्यार्थी संख्या 180 आहे. मुलींची संख्या जास्त आहे. ग्रामीण भाग जरी असला तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगल्या प्रकारे आहे, असे मुख्याध्यापकांनी प्रस्ताविकात सांगीतले. विलास गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना उपदेश केला, ज्यांचे लिखाण सुंदर आहे. त्यांची स्पर्धा पुढल्या कार्यक्रमात घेण्यात येईल. त्या विद्यार्थ्यांचा स्टेजवर बोलावून सत्कार करण्यात येईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव बिरादार यांनी केले.
त्यावेळी सहशिक्षक वंसतपूरे, स्वामी चेन्नबसवास्वामी सहशिक्षिका सौ. अर्चना शिंदे, सौ. राजश्री शिंदे, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन भानुदास वासरे यांनी केले. विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.