पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांची नणंद येथील गणेश मंडळाला भेट

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांची नणंद येथील गणेश मंडळाला भेट

निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील नणंद या गावी भारत गणेश मंडळातर्फे सन १९४७ पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. या मंडळात अनेक सांस्कृतीक कार्यक्रम व पारंपरिक खेळ खेळले जातात. या मंडळात मुस्लिम बांधव सहभागी होतात मंडळाकडून हिंदू मुस्लिम सामाजिक बांधिलकी, सलोखा जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी गावातील फत्तेअहमद हैदरसाब पटेल यांनी श्रीगणेशाची मुर्ती भेट दिली ही बातमी लातूरचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या कडे गेली हे पाहण्यासाठी व या मंडळाचे कौतुक करण्यासाठी दि.३ सप्टेंबर रोजी स्वतः भेट देऊन भारत गणेश मंडळाच्या श्रींची आरती करण्यात आली. श्री फत्तेअहमद हैदरसाब पटेल यांनी श्रीगणेशाची मुर्ती भेट दिल्या बद्दल पटेल कुटुंबियांचा श्री पिंगळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या कृतीमुळे सामाजिक बांधिलकी,सलोखा जपण्यासोबतच समाजाला एक नविन विचार देण्याच खूप मोठं काम केले असून येणारी नवीन पिढी यातून नक्कीच प्रेरणा व आदर्श घेतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी निलंगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण शेजाळ , श्री रमेश म्हेत्रे (psi) किल्लारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील गायकवाड. बीट अमलदार गणेश यादव तसेच गावातील जेष्ठ नागरिक रंगराव म्हेत्रे, तानाजीराव पाटील, उद्योजक सागर शिवणे व मंडळाचे विलास बोळे, नागनाथ म्हेत्रे, विठ्ठल पेठकर, अनंत पाटील, ऋषीकेश म्हेत्रे, संतोष घोडके, प्रशांत म्हेत्रे व सर्व पदाधिकारी, गावकरी, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित पाटील यांनी केले आभार ऋषिकेश म्हेत्रे यांनी मानले.

About The Author