उदगीर अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे बालवाड:मय पुरस्कार जाहीर
उदगीर (एल.पी.उगिले) : येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारे सन २०२१ चे बालवाड:मय पुरस्कार रविवारी जाहीर करण्यात आले असून या पुरस्कारासाठी मुंबई येथील रमेश तांबे, कोल्हापूरच्या नीलम माणगावे तर नांदेडचे वैजनाथ अनमुलवाड यांची निवड करण्यात आली. अशी माहिती संस्था पदाधिकाऱ्यांनी दिली.
यात कै. राजकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार मुंबई येथील रमेश तांबे यांच्या चिनूचे स्वप्न या बालकादंबरीस, कै. लक्ष्मीबाई विठोबा केदार स्मृती पुरस्कार नांदेड येथील वैजनाथ अनमुलवाड यांच्या रंग सारे मिसळू द्या ! या बालकविता संग्रहाला तर कै. विजयकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार कोल्हापूर येथील नीलम माणगावे यांच्या बिलोरी कवडसे बालकथा संग्रहाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५०५१ / – रू. रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. लवकरच एका शानदार कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रतिनिधी संजय ऐलवाड, अध्यक्ष प्रा. रामदास केदार, कार्यवाह रसूल दा. पठाण यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष दयानंद बिरादार, सहकार्यवाह अनिता यलमटे, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेंबडे, सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, ज्योती डोळे, प्रा. बिभीषण मद्देवाड, अंकुश सिंदगीकर, अंबादास केदार, चंद्रशेखर कळसे, चंद्रदीप नादरगे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. उदगीर येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था स्थापनेला ४ वर्षे पूर्ण झाली असून यापूर्वी एकनाथ आव्हाड, सुनिताराजे पवार, सुनंदा गोरे, संजय वाघ, आशा पाटील, संंजय ऐलवाड, शिवाजी चाळक, वर्षा चौगुले, प्रदीप देशमुख, सदानंद पुंडपाळ आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.