उदगीर तालुक्यातील 19 लोकांविरुद्ध फौजदारी दंडसंहिता कलम 144 अन्वये तालुक्यात प्रवेश बंदीची उपजिल्हा दंडाधिकारी यांची कारवाई

उदगीर तालुक्यातील 19 लोकांविरुद्ध फौजदारी दंडसंहिता कलम 144 अन्वये तालुक्यात प्रवेश बंदीची उपजिल्हा दंडाधिकारी यांची कारवाई

उदगीर (एल.पी. उगिले) : गणेश उत्सवात कोणतेहि विघ्न येऊ नये, उत्सव आनंदात साजरा करता यावा,या हेतूने या पूर्वी ज्यांचे रेकॉर्ड गुन्हेगारी प्रवर्तीचे आहेत,अशा लोकांना प्रशासनाच्या वतीने हद्दपरीची कार्यवाही केली जाते,याच पार्शवभूमीवर उदगीर येथील 19 जणांना हद्दपार करण्यात आली आहे.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव हे निर्बंधांमध्ये साजरे केले गेले.पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. त्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 31ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरवात झाली असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे.
उदगीर शहरात गणेशोत्सव व विसर्जन काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरीता उदगीर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणाऱ्या,उत्सवच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करून सरकारी कामात अडथळा करणारे,आदेशाचे उल्लंघन करणे,खुनाचा प्रयत्न करणे,दारू पिऊन लोकांना मारहाण करून जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे अशा प्रकारचे वर्तन करणारे लोकांवर तसेच अलीकडच्या काळात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या लोकावर उदगीर शहर व ग्रामीण पोलीस ठाणेच्या हद्दीतून दिनांक 04/09/2022 रोजी ते 06/09/2022 रोजी पर्यंत फौजदारी दंडसंहिता कलम 144 अन्वये “तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश बंदीची” कारवाई उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदगीर यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे.
उत्सव काळात लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे,गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, नागरिक,कार्यकर्ते यांची शांतता समितीची, पोलीस मित्र समितीची पोलीस स्टेशन स्तरावर बैठका घेण्यात आल्या असून गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव साजरा करण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
लातूर पोलीस दलांकडे असलेल्या मनुष्यबळा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांतून सुद्धा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी लातूर पोलीस दल सुसज्ज आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!