सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचा जुगारावर छापा. जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 4 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत; 15 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचा जुगारावर छापा. जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 4 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत; 15 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

लातूर (एल.पी.उगिले) : गणेश उत्सव असेल किंवा गौरी उत्सव असेल यादरम्यान जुगारी लोक जुगारातून आपले भविष्य आजमावत असतात. त्यापैकी प्रत्येकाला अशी एक भावना असते की, आपल्या नशिबात निश्चितपणे धनलाभ आहे. याच भावनेतून या काळात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला व खेळवला जातो. गणेशोत्सवात तर गणेश मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला खास पत्ते खेळण्याची जागा उपलब्ध करून दिलेली असते. या जुगारातून केटी च्या नावाने संयोजक पैसे जमा करतात. या येणाऱ्या पैशातून आपण काहीतरी सामाजिक कार्य करणार असल्याचे सांगत, कार्यकर्ते लोकांना वेडे जरी बनवत असले तरी, “ये पब्लिक है, सब जानती है” असे म्हणतात.
त्याप्रमाणे लोकांना या जुगारी प्रवृत्ती बद्दल माहिती असते. मात्र आता ते इतके अंगवळणी पडले आहे की, त्याचे काहीच नाविन्य वाटत नाही. याचाच फायदा घेत या सणासुदीच्या दरम्यान जुगाराचे अड्डे बहरलेले असतात, जुगाराला बहर आलेला असतो. मात्र कधी कधी सहाय्यक पोलीस अधीक्षक कदम यांच्यासारखा जांबाज अधिकारी आल्यास जुगारी लोकांना भारी पडते. याचे जिवंत उदाहरण म्हणून कदम यांनी जुगार अड्ड्यावर टाकलेली धाड पाहता येऊ शकेल.
गेल्या सहा महिन्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक कदम यांनी अवैध धंदे रोखण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत. जिल्ह्यातील सर्व झालेल्या धाडी आणि एकट्या कदम यांच्या पथकांनी टाकलेल्या धाडी, याची तुलना केल्यास कदम लाख पटीने भारी ठरतात!!

मग सर्वसामान्य माणसांच्या समोर हा प्रश्न येतो की, जे कदम यांना जमते ते इतर अधिकाऱ्यांना का जमत नाही? की इतर अधिकारी यासंदर्भात गुन्हेगारांची पाठराखण करतात? खैर काही असले तरी कदम यांची लातूर जिल्ह्यातील कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आणि अभिनंदन करावी अशीच आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक कदम यांनी टाकलेल्या धाडीत लाखो रुपयांचे साहित्य व रोकड जप्त करण्यात आली असून 15 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनात चाकूर उपविभागात येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

सदर पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 04/09/2022 रोजी सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाणे चाकूर हद्दीतील आष्टामोड येथील एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते खेळत असलेल्या तिर्रट जुगारावर छापा मारला. त्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आलेले 11 इसम व पोलिसांची चाहूल लागताच पळून गेलेले चार अनोळखी इसम यांच्यावर पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 323/22 कलम 12(अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 27 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास चाकूर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम,यांचे नेतृत्वात त्यांच्या पथकातील पोलीस ठाणे चाकूर येथील सहाय्यक फौजदार सुभाष हरणे, पोलीस अमलदार मारुती तुडमे, उदयसिंग चव्हाण, विपिन मामडगे , रियाज शेख, रितेश आनंदुरकर यांनी केली.

About The Author