वारकरी भवन बांधकामाला निधी द्या – मागणी

वारकरी भवन बांधकामाला निधी द्या - मागणी

उदगीर (एल.पी. उगीले) : उदगीर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी,श्रद्धास्थान हत्ती बेट तसेच तालुक्यातील इतर प्रेक्षणीय आणि भक्तीचे वातावरण असलेल्या ठिकाणांना भेटी देऊन परत आलेल्या वारकऱ्यांना, भक्तांना, भाविकांना थांबण्यासाठी वारकरी भवन बांधणे गरजेचे आहे. तसेच उदगीर शहरातही अनेक किर्तन, प्रबोधन, व्याख्यान अशा स्वरूपाचे अध्यात्मिक कार्यक्रम घेतले जातात. अशा कार्यक्रमासाठी तालुक्यातून आणि पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांना मुक्काम करता यावा, कारण रात्री बेरात्री कीर्तन, व्याख्यान संपल्यानंतर परत जाण्यासाठी गाड्या नसतात.
या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून वारकरी संप्रदायाच्या वतीने उदगीर शहरात वारकरी भवन बांधकाम करण्यात यावे. त्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून द्यावा. या संदर्भात अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे कार्यसम्राट आ. संजय बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदन देतेवेळी वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुकाध्यक्ष सुनील महाराज जवळे, वारकरी महामंडळाचे प्रवक्ते उद्धव महाराज हैबतपुरे, सचिव गणेश मुंडे डोंगरशेळकीकर, उपाध्यक्ष बालाजी बिरादार, बाबुराव माशाळकर, विनायक शिंदे, बळवंत सावळे, माणिक कसबे ,भगवान पंडित, गंगाराम केंद्रे, श्रीधर उदासी शाम डावळे, विशाल जाधव, सतीश जावळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विकास मूर्ती आमदार संजय बनसोडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन वारकरी संप्रदायाची मने जिंकली.

About The Author