श्यामलाल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

श्यामलाल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी. उगिले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये पाच सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद चोबळे तसेच प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण, प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये, इंग्रजी विभाग प्रमुख संजय देबडवार, मराठी विभाग प्रमुख प्रवीण भोळे, नारायण कांबळे यांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
शिक्षक दिनानिमित्त संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन इयत्ता नववी अ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अतिशय सुंदर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरादार शुभांगी बसवराज व मुदुडगे यशश्री सुरेश या विद्यार्थिनींनी इंग्रजी भाषेत अतिशय प्रभावीरित्या केले.
रागिनी प्रदीप ढगे, लाला रक्षिता सतीश, या विद्यार्थिनींनी शिक्षक दिना बद्दल प्रभावी भाषेत मनोगत व्यक्त केले. शिक्षकांचे राष्ट्राच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे , विद्यार्थी घडवण्याच्या कार्यात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यांच्या कार्याचा गौरव व कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस त्यानिमित्ताने सर्व शिक्षक बंधू, भगिनींना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
अर्णव कळसे, तांबोळी अमन, गौरव स्वामी, पाठक अनुष्का, देवणे श्रुती,स्नेहा घोरपडे, रंगदळ मधुरा या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे भाषण व गीत सादर करून सर्वांची मने जिंकली.
शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोपामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी सर्व शिक्षक, शिक्षिका यांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्याच्या कार्यात शिक्षकांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे, ते कार्य सदोदित अविरतपणे शिक्षकांनी पार पाडावे, विद्यार्थ्यांनी नियमितपणे शिक्षकाने दिलेला अभ्यास पूर्ण करून आपली शैक्षणिक प्रगती साध्य करावी. यासंबंधी मनोगत व्यक्त केले.
संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांना संदेशाद्वारे “पिढी घडविण्याचे लाख मोलाचे कार्य ज्या व्यक्तिमत्त्वाच्या हाती सोपवलेले आहे. त्या गुरुजनांना त्यांच्या या कार्यासाठी असंख्य शुभेच्छा.” या शब्दात शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाचे आभार बलुले गायत्री या विद्यार्थिनीने व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author