श्रीमती जैबरबी उस्मानखान पठाण यांच्या महालक्ष्मी पाहण्यासाठी गर्दी

श्रीमती जैबरबी उस्मानखान पठाण यांच्या महालक्ष्मी पाहण्यासाठी गर्दी

भाकसखेडा (एल. पी. उगिले) : गेल्या 70 वर्षापासून नित्य नेमाने भाकसखेडा येथील जेबरबी पठाण या मोठ्या उत्साहाने महालक्ष्मीचा सण साजरा करतात.महालक्ष्मीचा देखावा मांडतात.ते दृश्य पाहण्यासाठी गावातील सर्व महिला, पुरुष येत असतात.
त्यांच्या महालक्ष्मी पुढे सजविण्यात आलेला देखावा अत्यंत चांगला असतो. त्यांनीही परंपरा कायम जपत, त्यांचे सुपुत्र नबीसाहेब उस्मान साहेब पठाण यांनी कायम ठेवली आहे. त्याचे सर्व मुलं, नातवंडे, सुना या हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. त्यांनी भाकसखेडा गावांमध्ये हिंदू – मुस्लिम सणाची परंपरा कायम जपत एक आदर्श सर्वसमोर ठेवला आहे.

About The Author