लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी. उगिले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई, संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून ज्ञानोपासक मंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे तर, प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे, प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून सेवानिवृत्त शिक्षक उमाकांतजी कोनाळे व व्यासपीठावर मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते.
सर्वप्रथम शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे व उमाकांतजी कोनाळे यांच्या हस्ते शाळेतील गणेशाची आरती करण्यात आली.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवर पाहुण्यांचे शाळेच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले.शिक्षक दिनाचे औचित्य साधून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे व प्रमुख पाहुणे उमाकांत कोनाळे यांच्या हस्ते शाळेतील ज्येष्ठ आदर्श शिक्षीका सौ.श्रीदेवी कबाडे व आशालता कल्लुरकरबाईंचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला, तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी अभ्यासपूर्ण सविस्तर माहिती सांगितली.एक शिक्षक राष्ट्रपती होऊ शकतो, हे सर्व जगाला दाखवून दिले.असे मार्गदर्शन केले.
उमाकांतजी कोनाळे यांनी आपल्या शाळेतील सर्व शिक्षक हे शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी सतत धडपडत असतात.ही अभिमानाची गोष्ट आहे.शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे अनुभव सांगितले.आपणही डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडून प्रेरणा घेऊन आदर्श विद्यार्थी निर्माण करुन आदर्श शिक्षक बनण्याचा प्रयत्न करावा.असे आवाहन केले व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात व्यंकटराव गुरमे यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आयुष्यभर शिक्षकी पेशाला जागले.आपणही त्यांच्यासारखे आदर्श शिक्षक बनण्याचा प्रयत्न करा.असा संदेश देऊन शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश मिरगुडे यांनी केले.सुत्रसंचलन तुकाराम पेद्दावाड यांनी केले.वैयक्तिक पद्य रमेश सातपुते यांनी गाईले.आभार भाग्यश्री स्वामी यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने झाली.