शिक्षकांनी जीवनभर ज्ञान घ्यावे व विद्यार्थ्यांना द्यावे – प्राचार्य व्ही व्ही गंपले
अहमदपूर (गोविंद काळे) बदललेल्या जगामध्ये आजही समाज व्यवस्थेत शिक्षकाला मान सन्मान असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण ज्ञान देण्यासाठी शिक्षकांनी जीवनभर सकारात्मक ज्ञान घ्यावे व आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना ते खुल्या अंतकरणाने द्यावे असे आग्रही प्रतिपादन प्राचार्य व्ही व्ही गंपले यांनी केले. दि. 5 रोजी माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी यांच्या सत्कार प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव डी बी लोहार गुरुजी होते. यावेळी उप मुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे सहा मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांचा प्राचार्य व्ही व्ही गंपले सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग तत्तापूरे यांनी सूत्रसंचलन शरद करकनाळे यांनी तर आभार लक्ष्मण फड यांनी मांडले या कार्यक्रमाला अरुण मोरे, गुरप्पा बावगे, शिवाजी सूर्यवंशी, लक्ष्मण काळे, राजकुमार बोराळकर, गौरव चौंडा, सुदर्शन फुल मंटे, दीपक हिंगणे सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
