सरस्वतीताई गाढवे यांचे दुखद निधन
अहमदपूर (प्रतिनिधी) : येथील लिंगायत समाजातील जेष्ठ महिला सरस्वतीताई गणपतराव गाढवे यांचे मेंदूच्या अल्पशा आजाराने दि. 4 रोजी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता खाजगी रुग्णालयामध्ये वयाच्या 95 व्या वर्षी दुखद निधन झाले. त्यांच्यावर दि. पाच रोजी सोमवारी लिंगायत स्मशानभूमी मध्ये सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना ,नातू ,पणतू असा मोठा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ गाढवे, सुभाष गाढवे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
