शिक्षक दिनानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयात प्राध्यापकांचा सत्कार

शिक्षक दिनानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयात प्राध्यापकांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते सर्व प्राध्यापकांचा सौहार्दपूर्वक सत्कार करण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. त्यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व प्राध्यापकांचा शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रोफेसर व उपप्राचार्य डॉ. डी. डी.चौधरी, प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. पी. डी. चिलगर, डॉ. बी. के. मोरे, प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे, डॉ. दिगंबर माने, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. संतोष पाटील, प्रा. दत्तात्रय चव्हाण, प्रा. प्रकाश गायकवाड आदिंसह चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी इ. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यालयीन कर्मचारी श्री. अजय मुरमुरे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!