अहमदपूर ते काळेगाववाडी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपुजन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न!

अहमदपूर ते काळेगाववाडी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपुजन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न!

अहमदपूर ( गोविंद काळे ) : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अहमदपूर ते काळेगाववाडी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत आमदार यांनी आभार मानले. आपण केलेल्या पाठपुराव्यातून राष्ट्रीय महामार्ग ५६ ते अहमदपूर काळेगाववाडी रस्त्यावरील बुडीत पुलाच्या बांधकामासाठी ११८.९१ लक्ष रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. हे काम पूर्णत्वास गेले आहे असे यावेळी आपले मनोगत आमदार बाबासाहेब पाटील यांनी मांडले.

यावेळी सभापती शिवानंद तात्या हेंगणे, माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प सदस्य माधवराव जाधव, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, मुकदम ज्ञानेश्वर, अजहरभाई बागवान, श्रीकांत बनसोडे, प्रकाश फुलारी, आशिष तोगरे, वैजनाथ दरोड, प्रकाश ससाने, युवक तालुका अध्यक्ष दयानंद पाटील, इमरोज पटवेकर,उद्धवराव हालसे, नबी सय्यद, शेख फेरोज, बाळू घोगरे, शरीफ बागवान, फारूक मणियार, संतोष मेहकर, अभियंता राठोड, प्रकाशराव जाधव, सोपान जायभाये, भाऊसाहेब केंद्रे, शंकर केंद्रे, बलभीम केंद्रे, पांडुरंग केंद्रे, राहुल जाधव, रोड अभियंता सूर्यकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!