अमृतमहोत्सवा निमित्त अरसनाळ (महानगाव) येथे छत्रपती गणेश मंडळातर्फे पिंपळ लागवड
उदगीर : येथील अरसनाळ (महानगांव) येथे श्री छत्रपती गणेश मंडळाने कृषी भूषण गोविंदराव पवार यांच्या संकल्पनेतल्या दाट छाया देणा-या, दीर्घायु व मुबलक प्रमाणात ऑक्सिजन प्रदान करणा-या पिंपळवृक्षाच्या लागवडीचा सुत्त्य उपक्रम राबविला या प्रसंगी तहसीलदार रामेश्वर गोरे,महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक भरतभाऊ चामले, मंडळाधिकारी गणेश हिवरे, छत्रपती गणेश मंडळाचे अध्यक्ष अजय ऐनिले,उपाध्यक्ष रामेश्वर जयकर,सचिव विवेकानंद ऐनिले,श्रीहरी मोरे,सदस्य प्रशांत मोरे,ज्ञानेश्वर बिरादार, मुकेश चिल्लाळे,विक्रम मोरे,प्रविण वाडीकर, संतोष बिरादार,दत्ता भंडारे,दत्ता उटकुरे,पवन ऐनिले,सोम भंडारे,विठ्ठल चामले,विजय ऐनिले,विठ्ठल पिटले,अंकुश बिरादार,संभाजी मोरे,मुरली मोरे,महादेव ऐनिले,मारोती मोरे,मनोज चव्हाण, श्रीराम चामले,विष्णू धट्टे,ओमकार मोरे,कृष्णा ऐनिले,रणजित पाटील, जगदीश मोरे,अनिल उटकुरे,पंकज मोरे,कृष्णा ऐनिले व गावकरी उपस्थित होते.
