शिवाजी शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन उत्साह साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित शिवाजी प्राथमिक – माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया त
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातर्फे डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णण यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयातील प्रातिनिधिक स्वरूपात पुढील गुरूजनांचा त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाॅल व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
गायकवाड एस.बी,
पाटील आर.एम. , भंडारे एस. जी.,
घटकार आर.व्ही,
तांबरे डी.एम.,
कोचेवाड ,
तांबोळी सुमय्या ,
जनाबाई जवळे-तांबरे ,
शेख वाय.ए, यांचा शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे
प्रास्ताविक पर्यवेक्षक काबरा बी.आर., यांनी तर मैलारे एम.टी. यांनी प्रमुख वक्ते म्हणून गुरू- शिष्य परंपरेचे दर्शन घडवले.या प्रसंगी सय्यद आर.एम,घटकार आर.एस,तांबरे डी.एम, तांबोळी सुमैय्या या शिक्षक मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक हक्के एन.बी. यांनी विद्यालयातील आदर्श शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करून सर्व शिक्षक वृंद यांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.तर प्रमुख पाहुणे तेलंगे ए. के यांनी शिक्षक दिनाची पार्श्वभूमी प्रगट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख मोमीन ए.एस.यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
