राजस्थानी नवयुवक गणेश मंडळ आयोजित बूस्टर शिबिरात 63 जनांनी घेतले डोस
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथिल प्रसिद्ध श्री राजस्थानी नवयुवक गणेश मंडळाने सामाजिक कार्य डोळ्यासमोर ठेऊन कोरोना वॅक्सीनच्या बूस्टर डोस शिबिराचे आयोजन केले होते. त्या शिबिरात 63 लोकांनी बूस्टर डोस घेतले.
उदगीर येथिल श्री लक्ष्मीनारायण मंदिरात स्थित श्री राजस्थानी नवयुवक गणेश मंडळा च्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात संपर्क करून तेथील प्रमुख डॉ दत्ताजी पवार याना सामाजिक कार्य डोळ्यासमोर ठेऊन कोरोना लसी चे शिबिर आयोजन हेतू सांगितले असता त्यांनी त्वरित सोमवारी डॉ प्रवीण पाटील,सतीश आमगे यांच्या नेतृत्वखाली अमर कुटकुरे आणि सिस्टर माया दिगंबर गाड़ीलोहार यांना पाठऊन शिबीराचे आयोजन केले असता, त्या शिबिरात 63 जणांनी बूस्टर डोस घेतले,
हे शिबिर संपन्न करण्यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष राजगोपाल मनियार, उपाध्यक्ष आनंद बजाज,सचिव कल्पेश बाहेती,कोषाध्यक्ष आतिश बियानी, सहसचिव अमोल बाहेती, सहकोषाध्यक्ष अभिषेख टवानी, शिरीष नावंदर,रूपेश राठी, अमर सारडा,अमोल राठी,अनिल मालू,कैलाश मालू, गोविंदा सोनी, रोहित सोमानी, आदित्य बजाज, वेदांत वर्मा,पवन सोनी, रजत सारडा, वेदांत सोनी, निखिल सोमानी, करण करवा, नीरज मूंदड़ा यांनी विशेष परिश्रम घेतले!
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना डाॅ. दत्ताजी पवार म्हणाले की , बुस्टर डोस साठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत, जनता यास प्रतिसाद देत नाही,अनेक शिबिरात एकानेही बूस्टर डोस घेतला नाही, शहरात अनेक गणेश मंडल आहेत, पण कोणीही बुस्टर डोस शिबिराचे आयोजन केले नाही. श्री राजस्थानी नवयुवक गणेश मंडळाने सामाजिक जान ठेऊन हा उपक्रम हाती घेतला. त्यात 63 जणांनी डोस घेतले. मंडळाचे व त्यांच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेवढे कमी आहे , आता परत कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालली असून जनतेनी काळजी घ्यावी,आणि बुस्टर डोस घ्यावे असे आवाहन केले.
