जि. प. शाळा किणीयल्लादेवी येथे शिक्षक दिनानिमित्त नशाबंदीचा कार्यक्रम
वाढवणा (बु.हुकूमत शेख) : वाढवणा पासून जवळच असलेल्या किनी यल्लादेवी येथील जि. प. शाळेत दि. 5 सप्टेंबर सोमवार रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षकदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी तसेच शालेय समितीच्या वतीने शिक्षकांचा आदर सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन व कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ एस. डी कांबळे उपस्थित होते. यावेळी डॉ. विष्णू कांबळे शालेय समितीचे अध्यक्ष तथा नशाबंदि जिल्हा संघटक लातूर यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने नशाबंदी मंडळ व लोकसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किणीयल्लादेवी च्या वतीने नशाबंदीचे चित्र प्रदर्शन आयोजित केले.व उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षक गावकऱ्यांना व्यसनमुक्ती विषयी जनजागृती केली.यावेळी नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक डॉ. विष्णू कांबळे म्हणाले की,”नशामुक्त विद्यार्थी तयार झाला तर बलशाली भारत होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने व शिक्षकाने नशा मुक्त जीवन जगले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने मानवी जीवन सुंदर बनू शकते”. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित जीवन बिरादार ,विजय बिरादार, संदिप मुळे,शेख मुबारक, चक्रपाणी कांबळे, अतुल बिरादार, शालेय समितीचे सर्व सदस्य , मुख्याध्यापक कानवटे व सर्व शिक्षक व शिक्षिका अंगणवाडी सेविका व मदतनीस,आशा वर्कर व गावातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
