भारत भुमिचा कीर्तिवंत शिक्षक – सर्वपल्ली राधाकृष्णन – प्रा.शिवाजीराव देवनाळे
उदगीर (एल.पी.उगीले) : माणसा जवळ तत्वज्ञानाचा भक्कम पाया असला कि त्यांच्या अंगी नम्रता व सौजन्य येते. नम्रता आणि सौजन्याचा संगम असलेला व्यक्ती म्हणजे शिक्षक . चाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रात अध्यापनाचे कार्य करून शिक्षण क्षेत्राला मौलिक दर्जा मिळून देन्याचे कार्य ज्यांच्या हातून झाले ते सर्वपल्ली राधाकृष्णन भारत भुमिचे कीर्तिवंत शिक्षक आहेत. असे उद्गगार प्रा शिवाजीराव देवनाळे यांनी गुडसूर येथील पद्मावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात शिक्षक दिनी काढले. यावेळी मंचावर मुअ एन बी गोमरे, मु अ. व्ही .व्ही कांबळे उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रा. देवनाळे म्हणाले की, सर्वपल्लीच्या विचाराची खोली महासागराची होती. जगात ज्ञान आणि विज्ञानाची वाढ झाली तशी शहाणंपणाची वाढ झाली नाही तर तारक ज्ञान मारक ठरते. हा सर्वपल्लीचा विचार देशाला दिशा देणारा आहे.
कलकत्ता विश्व विद्यालयात प्रोफेसर, आंध्र विश्व् विद्यालयात उप कुलगुरू, आंध्र विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय तत्वज्ञ, बनारस विश्व् विद्यापीठाचे कुलपति, देशाचे पहिले उप राष्ट्रपती, देशाचे दुसरे राष्ट्रपती, राज्य घटनेच्या समितीचे सभापती, भारत रत्न, नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले सर्वपल्ली राधा कृष्णन प्रथम शिक्षक होते. त्याग आणि सेवावृत्ती असलेला शिक्षक देशासाठी काय देऊ शकतो, यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन.
शिक्षक ज्ञानाचा सागर होऊन विद्यार्थ्याला महासागर बनवीन्याचे स्वप्न पाहत पाहत तो शिकवीत असतो असेहि ते म्हणाले. या वेळी राजकुमार काकडे, कृष्णराज भोसले, प्रा मूडपे, सौ. शोभा शिंदे, अजय खिंडीवाले, पांडुरंग नवाडे, संभाजी पिंगळे या सह सर्व विद्यार्थी कार्यक्रमास मोठ्या सन्ख्येने उपस्थित होते.
