पारंपारिक व आधुनिक खेळ आरोग्यासाठी हितकारक – आर. एस नगरे
क्रीडा स्पर्धेचा थाटात समारोप
उदगीर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर आयोजित क्रीडा दिनाचे औचित्य साधून फिट इंडिया फ्रीडम रन हा उपक्रम मेजर ध्यानचंद हॉकीचे खेळाडू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात ध्यानचंद यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. स्पर्धा समारोप कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा शिक्षक नगरे म्हणाले की,योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे पारंपारिक व आधुनिक खेळ हे आरोग्यासाठी हितकारक आहेत. ध्यानचंद यांनी ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकले, भारतीय हॉकीचे सर्वश्रेष्ठ खेळाडू, भारतीय सेवेत 1921 ते1956 कार्य केले, 1956 साली पद्मभूषण सन्मान मिळवला,
यावेळी व्यासपीठावर प्रभारी मुख्याध्यापक अविनाश पोशट्टी ,पर्यवेक्षक व्ही . एम बांगे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अजने पी.व्ही, यांची उपस्थिती होती.राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेत विविध स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये पन्नास मीटर धावणे, खो खो, कबड्डी, हॉलीबॉल, थाळीफेक, गोळा फेक इत्यादी अनेक प्रकारच्या स्पर्धांचे समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक बाबुराव नागरवाड,क्रीडा शिक्षक आर. एस नगरे, कला शिक्षक एन.आर जवळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
