विद्यावर्धिनी शैक्षणिक संकुलातील नगरे, पवार ,सूर्यवंशी, वडगावे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

विद्यावर्धिनी शैक्षणिक संकुलातील नगरे, पवार ,सूर्यवंशी, वडगावे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

उदगीर (प्रतिनिधी) : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी शैक्षणिक संकुलात 5 सप्टेंबर 2022 शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शैक्षणिक संकुलातील श्रीमती सुबिद्रा वडगावे, संगीता पवार, ए. जी.सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक आर.एस नगरे यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाची कार्यकारणी सदस्य अजित पाटील तोंडचिरकर,विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अविनाश पो शेट्टी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही अजणे, उपमुख्याध्यापक बाबुराव नागरवाड, चंद्रकांत जाधव, परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील , कला शिक्षक एन.आर जवळे यांची यावेळी उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!