शिक्षक दिन उत्साहात साजरा
वाढवणा बु. (हुकूमत शेख) : वाढवना येथील जि. प.कन्या शाळा,मुलांची शाळा, के. प्रा. शाळेत राधाकृष्णन सर्वपल्ली यांची जयंती व शिक्षक दिन 5 सप्टेंबर सोमवार रोजी साजरी करण्यात आली
या वेळी शाळेतील मुख्याध्यापक शेख, दायमी, तांबोळी यांच्या हस्ते राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या प्रतिमेचे पुजन करून हार अर्पण केले या वेळी ज्या त्या शाळेत विध्यार्थी विध्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले शिक्षकांचे सत्कार करण्यात आले के. प्रा. शाळेत शिक्षक दिनाचा औचित्य साधुन भारताचा सवर्ण महोत्सव निमित्त संस्कृतिक कला कौशल्य स्पर्धा घेण्यात आले होते प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या विध्यार्थी विध्यार्थिनींना ट्रॉफी प्रमाण पत्र शिक्षण समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले या वेळी निबधं स्पर्धेत केंद्रात प्रथम येणारी विध्यार्थिनी आदिबा हुकूमत शेख या विध्यार्थिनीस ट्रॉफी व प्रमाण पत्र देऊन पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले,अबरार धावडे भाषण स्पर्धेत प्रथम यास प्रमाण पत्र देण्यात आले,जक्की मोमीन चित्रकला मध्ये प्रथम ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले अर्चना डुबुकवाड, खुरेशी अयान देश भक्तीपर गीत दुसरा क्रमांक, खुरेशी अहिल, उमर अली या विद्यार्थ्यां ना प्रमाण पत्र देण्यात आले तसेच शालेय व्यवस्था पण समिती तर्फे मुख्याध्यापक जाकीर तांबोळी शिक्षक वाकळे, देमगुंडे,गर्जे, धुप्पे, शिक्षिका इजारे,रेणापुरे यांचे शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शालेय समिती अध्यक्ष पठाण,उपाध्यक्ष तरवडे, पत्रकार हुकूमत शेख, फारूक खुरेशी, हारून खुरेशी, शाम सोमासे इत्यादी पालक शिक्षक विध्यार्थी उपस्थित होते.
