कर्तबगार व्यक्तीचा सत्कार इतरांसाठी आदर्श ठरतो – शिवाजीराव हुडे

कर्तबगार व्यक्तीचा सत्कार इतरांसाठी आदर्श ठरतो - शिवाजीराव हुडे

उदगीर (एल पी उगीले) : समाजामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून कोणाकडे पाहावे? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करून यशस्वी झालेल्या गुणवंतांचा आणि यशवंतांचा सत्कार होणे गरजेचे आहे. असे विचार उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी अण्णा हूडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर आडत व्यापारी असोसिएशनच्या श्री गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी आडत व्यापारी असोसिएशनच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुकही केले. शासनाने ठरवून दिलेल्या चाकोरीत राहून, उत्कृष्ट देखावे करून, समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव आणि सन्मान करण्याचा कार्यक्रम हा निश्चितच उल्लेखनीय आणि अभिनंदन आहे. अशा कार्यक्रमाचा आदर्श इतरांनीही घ्यावा. जेणेकरून समाजातील जे आदर्श आहेत, ते नव्या पिढीसमोर येतील.

सामान्यतः आपापल्या व्यवसायात मग्न असलेले आदर्श व्यक्ती हे प्रसिद्धीच्या झोतात न येता, अलिप्त राहून कार्य करत असतात. अशा व्यक्तींना समाजासमोर आणणे आणि त्यांनी मिळवलेले यश, इतरांसाठी कसे प्रेरणादायी ठरू शकते? या अनुषंगानेही मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. असेही शिवाजी अण्णा हुडे यांनी याप्रसंगी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!