शेकापूर वि.का.से.स.सो.शेकापूर आयोजित जिल्हा बँकेच्या वतीने शेकापूर येथे विमा रक्कम वाटप
उदगीर (लक्ष्मण फुलारी) : मौजे शेकापूर ता.उदगीर येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोबाईल व्हॅन द्वारे गावात जाऊन २०२१ ची तूरीला मंजूर झालेली विम्याची रक्कम वाटप करण्यात आल्याची माहीती शेकापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब अण्णाराव नवाडे यांनी दिली.लातूर जिल्हा बँकेत बचत खाते असणा-या सर्व खातेदारांना गावातच मोबाईल व्हॅन द्वारे तूरीच्या विम्याची रक्कम वाटप करण्यात आली.गावातच घरपोच विम्याची रक्कम सोसायटी व बँकेच्या वतीने वाटप केल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी शेकापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहृदय सत्कार करण्यात आला.
या वेळी बँकेचे कर्मचारी श्री मनोहर केंद्रे,अविनाश गुंट्टे,हरिभाऊ गुडसूरे व गटसचिव हंसराज मोमले यांनी मोलाचे सहकार्य केले.वाटपा प्रसंगी शेकापूरचे सरपंच ज्ञानोबा भानुदास कोनाळे,उपसरपंच नवनाथ शिंदे,चेअरमन बाळासाहेब नवाडे,व्हा.चेअरमन मधुकर सावंत,सदस्य-व्यंकट हलकरे,रतन कोनाळे,अनंत सावंत, व्यंकट पांचाळ,नरसिंग शेल्हाळे,भानुदास कांबळे माजी चेअरमन सुधाकर सावंत, माजी.सरपंच ज्ञानोबा गणेश कोनाळे,माजी.उपसरपंच संदीप हलकरे, मनोहर शिंदे,रामराव निवृत्ती कोनाळे,गुणवंत कोनाळे,जनार्दन कोनाळे,बालाजी मोरे,विठ्ठल मोरे,नागोराव सावंत,जनार्दन सावंत, रामदास उगीले,माधव उगीले,राघोबा सावंत,तानाजी सावंत,हरी बेळसिंगे बालाजी बेळसिंगे,सत्तार मुजावार,सुभाष पाटील, भाऊराव कोनाळे,प्रधान सावंत, राम हलकरे व ग्रामस्थ आदी मोठया संख्येंनी उपस्थित होते.
वाटपाच्या यशयस्वीतेसाठी प्रसाद हलकरे,व्यंकट पाटील, पंडित शेल्हाळे,गोटू शेल्हाळे,संदीप सावंत, लक्ष्मन कुंभार, परमेश्वर हलकरे,बापू वाघे दत्ता बालाजी शेल्हाळे आदींनी परिश्रम घेतले.
