निलंगा शिवसेनेच्या वतीने सौ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ममतादीन साजरा

निलंगा शिवसेनेच्या वतीने सौ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ममतादीन साजरा

निलंगा (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख हिंदुर्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुविद्य पत्नी सौ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज निलंगा येथे शिवसेनेच्या वतीने ममता दिन साजरा करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ममता दिन साजरा केला जातो. यामुळेच आज निलंगा शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालयात शिवसेना महिला आघाडी व शिवसेना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सौ मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे पूजन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे हरिभाऊ सगरे मुस्तफा शेख शिवाजीराव पांढरे सर, उमेश अप्पा रेशमे, सतीश फट्टे, माधव नाईकवाडे, बजरंग कांबळे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटिका रेखाताई पुजारी, शहर संघटिका दैवताताई सगर, सौ सविताताई पांढरे, श्रीमती अरुणा माने आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!