मराठवाडा शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी सिरसाट संजीव व सचिव पदी बावगे गुरप्पा यांची निवड

मराठवाडा शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी सिरसाट संजीव व सचिव पदी बावगे गुरप्पा यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : पाच सप्टेंबर मंगळवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून यशवंत विद्यालयात मराठवाडा शिक्षक संघाच्या तालुका व शहर कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य मधुकरराव जोंधळे व जिल्हा कार्यकारणीचे सदस्य मुख्याध्यापक गंपले व्ही व्ही, डांगे पी एन, मुख्याध्यापक पांचगे एस. एस. यांच्या उपस्थितीत  कार्यकारणीची निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये मराठवाडा शिक्षक संघाच्या तालुका अध्यक्ष पदी संजीव सिरसाठ व तालुका सचिव पदी  गुरप्पा बावगे व तालुका कार्याध्यक्ष म्हणून कुकाले, तालुका उपाध्यक्ष कुटे, शहराध्यक्ष काकडे शरदचंद्र शहर सचिव पदी शरद कारकनाळे व शहर कार्याध्यक्षपदी लक्ष्मण फड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून संजीवकुमार देवनाळे यांची निवड करण्यात आली.          या बैठकीसाठी बापूजी विद्यालयचे मुख्याध्यापक डांगे पी. एन. मुख्याध्यापक पाचंगे एस. एस .हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निवडीकरता कुंभार बी, कुंटे एस. आर, सूर्यवंशी एस. आर, खळुरे एम. एस, बोराळकर आर. जी. धाराशिवे व्ही. एस, रोडगे बी. जी, मिरजगावे सी . व्ही, केंद्रे पी. पी. आदीची  उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करकनाळे एस. ए. यांनी केले तर आभार फड  एल. बी. यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!