स्वामी विवेकानंद महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भारताचे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. भारतीय परंपरा, तत्वज्ञान, संस्कृती जागतिकस्तरावर पोहचविण्याच्या कार्यात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान अतुलनीय आहे. एक शिक्षक ते भारताचे राष्ट्रपती या कालखंडातील त्यांचे देशाच्या उभरणीतील कार्य वादातीत आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. माने यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य व्यंकट कीर्तने, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. नारायण कांबळे, कार्यक्रमाधिकारी एजाज पठाण, सांस्कृतिक विभागाचे डॉ. गोविंद काळे, प्रा. गंगाधर वडवळे, डॉ. नवनाथ पुरी, डॉ. विलास कांबळे, डॉ. एस. पी. घायाळ, डॉ. व्ही. के. पाटील, डॉ. बी. व्ही.पाटील आदी शिक्षक, शिक्षकेत्तर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जीवन गंगणे यांनी तर आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवराज पाटील यांनी व्यक्त केले.
