भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा युवा वॉरियर्सचा शाखा अनावरणाचा मेगा उपक्रम

भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा युवा वॉरियर्सचा शाखा अनावरणाचा मेगा उपक्रम

युवा वॉरिअर्सचा उपक्रम : एकाच दिवशी सहा फलकांचे अनावरण

लातूर (प्रतिनिधी) : शहरात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर,भाजपयुमोचे प्रदेश प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, लातूरचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व खा.सुधाकर श्रृंगारे, आ.रमेश कराड, आ.अभिमन्यु पवार, युवा वॉरिअर्यसचे संयोजक अलोक मोरे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे,भाजयुमोचे लातूर शहरचे प्रभारी रवी पाटील खतगावकर यांच्या संकल्पनेतून भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी शिवजयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा युवा वॉरिअर्सच्या माध्यमातून मेगा शाखा अनावरणाचा उपक्रम राबविला असून किल्‍ले सिंहगड येथून सुरू झालेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून लातूर शहरामध्ये सहा ठिकाणी, मेगा कार्यकारीणीच्या माध्यमातून शाखा अनारणाचा उपक्रम राबविला. त्यांच्या या विधायक उपक्रमामुळे भाजयुमोचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढले असल्याची चर्चा पदाधिकार्‍यांतून समोर येत आहे.

यावेळी वीर हनमंतवाडी, मजगे नगर, बसवेश्‍वर चौक, कृष्णा नगर, शंकरपूरम् नगर, राजीव नगर कव्हा येथील शाखा अनावरण कार्यक्रम युवा नेते आजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी गणेश गोजमगुंडे, संजय गिर, गजेंद्र बोकन, पुनम पांचाळ, राजेश पवार, कमलाकर डोके, धनंजय हाके, प्रेम मोहिते, आकाश बजाज, महादेव पिटले, आफ्रिन खान, अजय कोटलवार, पंकज देशपांडे, चैतन्य फिस्के, धिरज राजणाळे, कव्ह्याचे लक्ष्मण सुर्यवंशी, अ‍ॅड.किशोर शिंदे, योगेश गंगणे, गणेश पवार, संदिप ढोपे, गोविंद सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच वीर हनुमंतवाडीचे शाखा अध्यक्ष सोमनाथ सुर्यवंशी, मजगे नगरचे शाखा अध्यक्ष आशिष बोंडगे, बसवेश्‍वर चौक शाखेचे शाखाध्यक्ष आकाश पिटले, कृष्ण नगरचे शाखाध्यक्ष महेश मुंढे, शंकरपूरम् नगरचे शाखाध्यक्ष शशिकांत साळुंके, राजीव नगर,कव्ह्याचे शाखाध्यक्ष संभाजी मोटे यांच्यासह गणेश खांडेकर, सागर देवकते, वैभव बिराजदार, रोहन करडे, अमोल पवार, विनय चव्हाण, अर्जुन ईटकर, अविनाश दामा, दिनेश भोईनवाड, रोहित बिडवे, विलास दानाई, सुरज कांबळे, अभिजीत भोसले, राहुल दामा, सागर बिडवे, शुभम सारगे, ओमकार घार, इम्रान शेख, मारोती सुरवसे, विजय सारगे, विजय कारले, विशाल आवले, श्रीकांत घार, पवन सावंत, शुभम गायकवाड, विवेक वाघमारे, कृष्णा मुंढे, वैभव चेपट, अमर इंगळे, अमर कैले, सुमीत पवार, आकाश ठाकूर, स्वप्नील मुळे, सुरवसे, समाधान सुरवसे, बाळू खोमने, ओमकार काळे, मिनाज शेख, राजू भंडे, सुरज बिराजदार,गणेश शिंदे, आकाश कोरे, महेश कांबळे, निखील सुर्यवंशी यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्च्या,लातूर शहर जिल्हा युवा वॉरिअर्सच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!