हिवरा येथे विनायका मेडिकलला आग;चार लाखाचे नुकसान

हिवरा येथे विनायका मेडिकलला आग;चार लाखाचे नुकसान

महागाव (राम जाधव) : महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील श्री विनायका मेडिकल स्टोअर्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.या अग्नी तांडवात दुकानातील जवळपास चार लाखाची औषधी जळून खाक झाल्यात.
गावातील मुख्य रस्त्यावरील श्री विनायका मेडिकल जनरल स्टोअर या सुहास सुरेश जोशी यांच्या दुकानाला शनिवारी (दि.२०) रात्री ९वाजता अचानक आग लागली.दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले.त्यांनी तात्काळ दुकान मालकाला माहिती दिली.दुकान मालकाने घटनास्थळी धाव घेऊन शटर उघडले असता अग्नितांडव त्यांना दिसले. त्यानंतर गावातील काही युवक व नागरिक आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांच्या मदतीने शेजारील असलेल्या गोठ्यातून व घरातून बकेट व हंडा या साहित्याच्या माध्यमातून पाणी आणून जवळपास 1तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुहासने 1 वर्षांपूर्वीच मुख्य रस्त्यावर मेडिकल स्टोअर सुरू केले होते. यावेळी मेडिकलला लागलेल्या आगी मध्ये जवळपास चार लाखाचे नुकसान झाल्याने सुहास जोशी यांना धक्काच बसला आहे.
मात्र या आगीमध्ये दुकानातील फर्निचर,औषधी गोळ्या, फ्रिजसह चार लाखाचे नुकसान झाले आहे. ही आग दुकानातील इलेक्ट्रिक वायर मध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते आहे.

About The Author

error: Content is protected !!