शिवछत्रपती युवक गणेश मंडळांकडून विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात आले

शिवछत्रपती युवक गणेश मंडळांकडून विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात आले

उदगीर (एल.पी.उगीले) : या वर्षी शिवछत्रपती युवक गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर तर्फे सामाजिक उपक्रमांतून सर्वसामान्यांना अधिकाधिक लाभ व्हावा, या उद्देशाने यंदा उपक्रमांवर भर दिला होता. तिरुपती लाडू चा आस्वाद असलेले 11000 लाडू वाटप करण्यात आले

मंडळाच्या वतीने या वर्षी तरुणांनी पुढाकार घेऊन विविध लोकोपयोगी पोवाड्याचा कार्यक्रम राबविण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी भाषण स्पर्धा गितगायन स्पर्धा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये 300 च्या वर विद्यार्थी व 20 च्या वर शाळेंनी सहभाग नोंदवला होता. पर्यावरण संरक्षण साठी विविध ठिकाणी मंडळाच्या वतीने 251 वृक्षारोपण करण्यात आले
नागरिकांनि मतदान कार्ड ला आधार लिंक करून घ्यावी याचे प्रबोधन करण्यात आले, सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून मोफत कोरोना चा बूस्टर डोस देण्याची सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिली होती, तर मंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने राबवलेल्या विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यासह नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या आजारांचा जोर वाढता असल्याने साथीच्या आजारांना अटकाव घालायचा असेल तर काय करायला हवे याची माहिती गणेश मंडळांच्या माध्यमातून दिली गेली. विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत झाडे लावा झाडे जगवा,बेटी बचाव बेटी पढाव, स्वछ उदगीर सुंदर उदगीर, शेतकरी जगला पाहिजे असे संदेश देण्यात आले. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डी जे न लावता संत ज्ञानेश्वर माऊली शाळेच्या साहाय्याने लेझिम पथक व ढोल पथक ठेऊन एक वेगळा आदर्श गणेश मंडळासमोर ठेवण्यात आला. हानिकारक गुलाल उधळण टाळून गुलाल मुक्त पुष्पवृष्टी करून अतिशय आनंद उत्सवात बाप्पाना शिवछत्रपती गणेश मंडळातर्फे निरोप देण्यात आला.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!