महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मतदान आणि आधार कार्ड लिंक जागृती कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी. उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारत निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र सोबत आधार लिंक करण्याची सर्वव्यापी विशेष मोहीम आयोजित केलेली आहे, त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्या मार्फत मतदान ओळखपत्र आधार लिंक करणे संदर्भात जनजागृती करण्यासंदर्भात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर येथील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष गुट्टे होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके होते. यावेळी गुट्टे म्हणाले प्रत्येक नागरिकांनी मतदान ओळखपत्र सोबत आधार लिंक करून घेणे अत्यावश्यक आहे. तिरुके म्हणाले निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आधार लिंक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन या संदर्भातील माहिती विविध माध्यमांच्या द्वारे देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ.आर.के.मस्के यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.डॉ.मल्लेश झुंगास्वामी यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.बी.एस.होकरणे यांनी मानले. कार्यक्रमास श्याम गायकवाड, प्रा.डॉ.एस.व्ही. आवाळे, प्रा.डॉ.बि.डी करंडे, प्रा. पी.पी.वाघमारे, प्रा.राहुल बिरादार यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.